*चिवू ताई* चिवू ताई आली माझी चिवु ताई आली, अंगणात माझ्या दाणे टिपू लागली. दाणे खाता खाता पाही इकडे तिकडे. चोचभर दाने, घेऊन जाते बाळाकडे. इवलेसे पोट तिचे, किती छोटीशी भूक. पटकन मिळवते किती मोठे सुख. चोचीने विनते , सुंदर से घरटे. पिलांन साठी बनवते छोटेसे खोपटे. आभाळात उडे, उंच उंच उंच. पंख फड फडत, अर्धा अर्धा इंच. टाच वर करूनी, पाहे टकमक. नाही कधी पाहिले तिने, पिल्लांची चकमक. काळीज तिचे भरलेले, कधी न हरलेले. पिल्लांसाठी जगायचे तेवढेच मनात ठरलेले. खटपट सारी पिल्लांनसाठी, आभाळ सारे फाटलेले. हिंमत नाही हरायची, एवढेंच तिचे ठरलेले.... अडचणी येतात, ठेच लावून जातात. घाबरून न जाता, लढायला शिकवतात. मजा तर सगळेच बघतच असतात. अडचणीच्या काळात हात खडे करतात. इवलिशी चिमणी शिकवून जाते, रडता रडता हसायला लावते. अन् संकट आल्यावर लढायला लावते... लेखन : ® सौ.समता दिपक पाटील पुणे, महाराष्ट्र. दि. 20/03/2024