माझी सायकल (श्रुतेश ची कविता)
*माझी सायकल*
मी एकदा एक सायकल आणण्यास गेलो
माझ्या आई व मी रिक्षामध्ये चढलो
रिक्षावाला थांबला खूप वेळ
मला वाटले कोणते चालू आहे खेळ
परत रिक्षावाला कंटाळून गेला
मी म्हणालो पटकन चला
एकदाच रिक्षावाल्याने गाडी हलवली
तेथून लगेच गाडीतळात पोहोचली
गाडी तळामध्ये आम्ही उतरलो दुकान शोधायला
वेळ नाही लागला चांगले दुकान सापडायला
त्या दुकानाकडे आम्ही गेलो
सगळ्या सायकली आम्ही पाहिलो
त्यातील एक सायकल होती तगडी जवान
तिच्यासमोर फिका पडे सप्तरंगी इंद्र कमान
आम्ही त्याच सायकलीला निवडले
किंमत किती दुकानदाराला विचारले
दुकानदार म्हणाला किंमतच खूप भारी
चांगली आहे सायकल घेऊन जा घरी
मी थोडा वेळ सायकल फिरवली
फिरवता फिरवता आजी भेटली
आई आजी सोबत छान बोलली
त्यांच्यासोबत आईने सेल्फी काढली
नंतर एक बस स्टॉप ला थांबली
आम्ही चढायला घाई केली
आम्ही एका बाजूला बस मध्ये सायकल ठेवली
पिशवीतून चटकन पर्स बाहेर काढली
पर्स मधून पंधरा रुपये काढले
लगेच कंडक्टरने तिकीट दिले
बस आमची गोपाळपट्टीला थांबली
कोपऱ्यातून सायकल बाहेर काढली
घरात जाऊन सायकल फिरवली
नंतर मग स्वच्छ धुतली
असा हा माझा दिवस चांगला गेला
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर
मला खूप आनंद मिळाला.
श्रुतेश दिपक पाटील.
Comments
Post a Comment