श्रुतेश ची डायरी


पुस्तकाचे नाव : एक होता कार्व्हर
लेखिका : वीणा गवाणकर

*मेरी च पोर*

डायमंड ग्रोव्ह मध्ये कार्व्हर कुटुंब राहत होते. तेव्हा मोझेस बाबांनी मेरी नावाच्या एका गुलामाला विकत घेतले होते. त्यांना गुलामगिरी बद्दल खूप हेटाळणी वाटायची. पण काम (शेतीचे व स्वयंपाकाचे) जास्त होते. म्हणून त्यांनी त्यांच्या मित्र कडून एक गुलाम स्त्री विकत घेतली. तेव्हा एका सकाळी मोझेस बाबा नाजूकशा निग्रो पोराला म्हणाले, "अरे,तू लवकर उठत जा ना आपल्याला कामं किती आहे? तू जर लवकर उठला नाहीस तर आपल्या कामाचं वाटोळं होईल." त्याची धर्मपत्नी सुझन बाई म्हणाल्या, "अहो असुद्या, काल काम करून हे नाजूकसं पोर थकलयं आराम करूद्या, त्याला."
मोझेस बाबा म्हणाले,"ह्याच्या पायी तर मी स्वतःचा उमद्या घोडा विकला."
झाले असेच की,मोझेस बाबांनी जेव्हा मेरी ला विकत घेतले, त्यानंतर एका आठवड्याने मध्यरात्री काहीतरी खुडबुड ऐकून मोझेस बाबा जागे झाले. तेव्हा काखेत बंदूक सावरून मोझेस बाबा एका लाकडी ओंडक्याच्या घरात आले. त्यांनी मेरी ला त्या लाकडी ओंडक्यांचे घर दिले होते. त्यांनी तिला स्वतंत्र ठेवले होते. पण,मेरी ला पळवण्यासाठी चार-पाच माणसे घोड्या वरून आली होती. तेव्हा त्यांनी मेरीच एक-दोन वर्षाचं पोरा सोबत मेरी ला सुध्दा नेले होते. तेव्हा मोझेस बाबांनी त्या लाकडी ओंडक्याच्या घरात पाहिले तेव्हा त्यांना मेरी च 6-7 वर्षाचं मोठ्या पोरासोबत त्यांना 4-5 वर्षाची मुलगी मृत्युमुखी पडली होती,  तेव्हा मोझेस बाबांनी एक उमद्या घोडा त्या मेरीला पळविणाऱ्या माणसांना देवून मेरी ला व त्या छोट्या पोराला मागितले तेव्हा त्यांनी ते पोर देवून म्हणाले की,"मेरी आमच्या हातून मारली गेली आहे." तेव्हा सुझन बाईंना रडूच कोसळले. ते लाकडी ओंडक्याच्या घरात सुध्दा त्यांना जाणं असह्य झाले. तेव्हा मोझेस बाबांच्या आधाराने त्या त्या घरात जात होत्या.  
तेव्हा पासून मोझेस बाबा व छोट पोर व मोठा पोरगा 'जिम' शेतात राबत होते. तेव्हा मोझेस बाबांनी छोट्या पोराला सर्वकाही शेतीच सांगून ठेवलं होतं. तेव्हा यायगर नावाचा एक माणूस पूर्ण मिझुरी मध्ये संपूर्ण जागेत द्राक्षेचे बाग जागो-जागी उभारली होती. त्याने द्राक्षनियमात सुधारणा केली होती तेव्हा मोझेस बाबा छोट्या पोरा सोबत जिम ला घेवून भेटले.ते छोटस पोर सर्व बाग न्याळीत होतं. मोझेस बाबा व यायागर साहेबांच्या मध्ये न घुटमळता तो त्या बागेतील सर्व द्राक्षेची झाडे पाहत होता. तेव्हा यायगार साहेबांचं लक्ष त्या छोट्या पोरावर गेले. ते त्याला जवळ बोलवून आपल्या खिशातले छोटे पुस्तक देत म्हणाले,"तू हे पुस्तक जसे द्राक्षे न्याहाळीतोस तसे वाचून काढ."
तो जाता-येता ते पुस्तक वाचीत होता. तेव्हा सुझन बाई व मोझेस बाबा म्हणाले की आपण याला धर्माचं सर्व काही शिकवायला हवं. म्हणून ते त्याला एका चर्च मध्ये पाठवायचे. रोज तो चर्चच्या एका कोपऱ्यात अंग चोरुन बसत असे तेव्हा चर्चा मधील गाणी त्याच्या मनाला सुखावत होती,शांत करीत होती. पण प्रवचने मात्र त्याला मुळीच आवडायचे नाही. तेव्हा घरी त्याला बायबल मोझेस बाबांनी त्याला देऊ केले होते. रोज तो बायबल वाचत असे, तो त्या बायबलचा पाठलाग अजिबात सोडत नव्हता. त्याला त्या बायबल मधले काही श्लोक  त्याचे मन रिझवत होत्या. त्याचे काहि दिवसातच सर्व बायबल वाचून झाले होते, तेव्हा परत तो शेतीकडे वळला होता. तो प्रत्येक रोपटे तिकडून सुर्य प्रकाशात ठेवत होता.
शेजारच्या काकू सुझन बाईंकडे यायची. एक दिवस त्या बाग न्याहाळीत होत्या तेव्हा रोपट्या फुलांनी त्याचे मन आनंदी झाले होते. त्यांनी सुझन बाईंना सर्व प्रश्न खोदून खोदून विचारत होत्या. तेव्हा त्यांनी माळ्याचे नाव विचारले. तेव्हा सुझन बाई नी छोट्या मळ्याला बोलावले. आणि ह्याचे नाव जॉर्ज आहे असे सांगितले. तेव्हा जॉर्ज गुणगुणत शेजारच्या काकूंकडे गेला. त्यांनी त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाले की एवढंसं पोर बाग राखतं. तेव्हा सुझन बाई मध्येच म्हणाल्या की याला स्वयंपाक सुध्दा येते. 
सुझन बाईंनी मोझेस बाबांना सांगितले की, "याला सुध्दा आपण निओशो या गावी निग्रो चीं एक जुनी पुरणी शाळा आहे. त्यात घालू.शिवाय तो 9-10  वर्षांचा झाला आहे." 3-4 वर्षाचं असताना त्याने काडी,कापूस,धागा व पाने वापरून एक रहस्यमय घरटे तयार केले होते.
सोबतच जिम सुध्दा कामासाठी बाहेर गेला होता. तेव्हा मोझेस बाबा म्हणाले की ह्या पोराला(जॉर्जला) येथेच राहू दे. पण सुझन बाईंच्या विनंती ने त्यांनी उद्या त्याला निओशो गावी पाठवायचे ठरवले होते. दुसऱ्या दिवशी जॉर्ज शाळेत जायची तयारी करत होता. त्याच्याकडे कपडे नसल्या मुळे तो मोझेस बाबांचा विकत घेतलेला शर्ट घालून त्यांचा पँट अर्धा कापून घातला व एक वही घेवून तो निघाला. एक कोस अंतरावर गेल्यावर त्याने मागे पाहिले मोझेस बाबा पळत पळत येत होते.त्यांनी जॉर्ज च्या कानात तुझा रस्ता स्वतंत्र आहे असे सांगितले. तो आता एकटाच जात होता. 
(क्रमशः)

- श्रुतेश दिपक पाटील
    इयत्ता चौथी 
दिनांक:21/11/2023.

Comments

Popular posts from this blog

गुरू वंदन

मजेत शिकूया संगणक,भाग-1