भावपुर्ण आदरांजली... कविवर्य नारायण सुर्वे
*गिरणगावचे सुर्वे मास्तर* *------ कविवर्य नारायण सुर्वे* गिरणी कामगार असलेल्या *गंगाराम सुर्वे* यांना चिंचपोकळी येथे एका फुटपाथच्या बाजूला कचरा कुंडीजवळ एक अनाथ मुलगा सापडला (१९२६). त्यांनाही मुलबाळ नसल्याने त्यांनी व पत्नी *काशीबाई* यांनी त्या अनाथ मुलाला वाढवले. *नारायण गंगाराम सुर्वे* हे नावही दिले परंतु परळ बोगद्याच्या चाळीत लहानाचा मोठा झालेल्या नारायणला अठरा विश्व दारिद्र्य, कमालीचे काबाडकष्ट तसेच जगण्यासाठीचा संघर्ष करावा लागला. नारायणला लिहिता वाचता यावे म्हणून महानगरपालिकेच्या शाळेत घातले. *गंगाराम सुर्वे* हे मूळचे कोकणातील हेताची वाडी (भुईबावडा) येथील होते. गिरणीतून निवृत्त झाल्यावर (१९३६) नारायणच्या हातावर दहा रुपये ठेवून ते आपल्या गावी निघून गेले. त्यावेळी नारायण नुकताच चौथी पास झाला होता (वय वर्ष १०).आता नारायण पुन्हा एकदा या जगात अनाथ झाला. आता टीचभ...