श्रुतेश ची डायरी भाग 2
पुस्तकाचे नाव : एक होता कार्व्हर
लेखिका : वीणा गवाणकर
ज्ञानासाठी दाही दिशा...!
जॉर्ज ला निवोशो ला पोहोचायला रात्र झाली. त्याने त्याचं दुबळ शरीर गोठ्यात विसाववल. तो तेथेच झोपी गेला, सकाळी जागा होवून पाहतो की काय..! समोर एक भलामोठा कुत्रा त्याच्या अंगावरती भुंकत होता. आपण पकडले जावू म्हणून जॉर्ज ने धूम ठोकली. तो पटकन एका दगडा वरती बसला.आणि तडक शाळेला निघाला. तेंव्हा तेथे सगळेजण निग्रोच निग्रो होते. तेंव्हा तेथे कोणीच गोरे नव्हते. त्याला एका शिक्षिकेने पाहिले. त्यांनी आशाच भरपूर विद्यार्थांना पाहिले होते पण जॉर्ज सारख्या गरीब पेहरावतला,शांत नजरेचा आणि उत्सुक नजरेचा कोणताही निग्रो विद्यार्थी त्यांनी पहिला नव्हता. त्यादिवशी त्याच गबाळ ध्यान,त्याच्या गोठ्यातील चिकटलेली गवताची तुरे आणि त्याचा चिरका आवाज आणि त्याच्या बोलण्यातील आडखळणे पाहून सर्व विध्यार्थी त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. दुसऱ्यदिवशी जेव्हा पाहाट झाली तेव्हा कोणी तरी त्याला काठीने उचलून उचलून उठवत होत. तेंव्हा तो खडबडून जागा झाला आणि त्याच्या मनात विचार आला की मालकाला आपला सुगावा लागलेला दिसतोय. आपण पकडले जाणार की काय..?? तो जेव्हा उठला तेव्हा ढसा ढसा रडू लागला.तेव्हा त्याला उचलून उचलून उठवणारा तो माणूस म्हणाला "उगी उगी रडू नको,तुला मी मारायला आलो नाही " तेंव्हा त्या माणसाने त्या जॉर्ज ला आपल्या घरी नेले. त्या माणसाचे नाव होते ' जॉन मार्टिन ' त्याची एक स्वतःची पिठाची गिरणी होती. त्यांना मूलबाळ नसल्या मुळे त्यांनी जॉर्जलाच आपला मुलगा मानले. त्यांनी त्यावेळी जॉर्ज ला जेवायला, खायला दिले. आणि त्याला शाळेत पाठवले. शाळेतून घरी आल्यावर त्याला सकाळ सारखेच भरपेट जेवण दिले.आणि झोपवले. जॉर्ज मनातल्या मनात म्हणत होता भरपेट जेवल्यावर किती छान झोप येते. आसं म्हणत तो शांत पने झोपी गेला. दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे त्याच्या धर्मा नुसार चर्च मध्ये पाठवण्यात आले. सगळे कसे सजलेले, जॉर्ज आपले अंग चोरुन एका कोपऱ्यात मागच्या वेळी सारखे बसला होता. त्याला गाणी खुप आवडायची. तो कमसारखा तेथे गुंतूनच होता. तेथे मारिया आत्या भाली मोठी उंच व खूप मोठ्या मनाची होती. ती तिच्या ख्रिस्ती धर्मा नुसार चर्च मध्ये आली होती. तिने जॉर्ज ला पाहिले,तेव्हा ती त्याच्या जवळ जावून भरपूर गप्पा मारली. त्याला काही दिवसातच चर्च चा कंटाळा आला.तो बाहेरूनच गवतात पडून गाण्याचे सुर ऐके.त्यामुळे त्याला निसर्गातच देव आहे अशी जाणीव होवू लागली. तो त्या निसर्गातच छान रुळला होता. त्याच्या मनातल्या घूमेपना मुळे जॉन मार्टिन ने त्याच्या धर्माच्या माणसात मिसळवन्याचे ठरवले. तेव्हा तो थोडा थोडा मिसळू लागला पण पूर्ण मिसळला नाही. तेव्हा जॉन मार्टिन ने आपल्या माणसानं मध्ये पाठवण्याचा निश्चय केला. त्यात पण तो थोडा थोडा मिसळला पण पूर्ण मिसळला नाही. तेव्हा कुठे त्याच्या मनातला घुमेपना कमी झाला.
तो दुसऱ्याच्या सोबत मिळून मिसळून राहू लागला,सगळ्या मुलांच्या खेळू लागला, बागडू लागला यामुळे जॉन ला आनंद झाला.त्याचे आता प्राथमिक शिक्षण संपत आले होते. एके दिवशी त्याला जॉन ने मासेमारी करायला पाठवले तो आनंदाने तेथे गेला पण मुलांनी जेव्हा गळाला गांडूळ बांधले तेव्हा मात्र तो पिसाळला म्हणाला, "तुम्ही अशा क्रूर पने माशांची पिल्ले माराल तर देव तुम्हाला शिक्षा करेल." त्याने पटकन सर्वांकडून मासेमारीचा गळ काढून घेतला व घरी निघाला. या प्रसंगामुळे सर्व मुले थबकली. जॉन ही चिंतित पडला.तेव्हा काही दिवसातच त्याची चौथी ची परीक्षा लागनार होती. त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी त्याने झप झपं काम मागायला चालू केले.जॉन ने सुध्दा त्याला काम करून पैसे मिळवायला सांगितले. सौ. मार्टिन च्या आगोदर उठून घरकाम आटोपून हातात पडेल ते काम करायचं पण त्या छोट्या मुलाकडून काय काम करून घेणार? शेवटी एकाने एका दूध डेअरी जवळ सोडले. मग त्याला एका न्हाव्याच्या दुकाना समोर त्याला एक पाटी दिसली, 'कामासाठी मुलगा हवा..!'
झालं पैशाचा प्रश्न सुटला.
श्रुतेश पाटील, पुणे
Comments
Post a Comment