मजेत शिकूया संगणक,भाग-2
# मजेत शिकूया संगणक
भाग दोन
विद्यार्थीमित्र हो,
आज आपण पाहणार आहोत...
1.संगणक का शिकायचे?
2.संगणक कोण कोण शिकू शकतात?
3.विद्यार्थी म्हणून मला संगणक चा उपयोग कसा होईल?
4.संगणक शिकून कोणत्या ठिकाणी नोकरी करता येते?
#############################
1) संगणक का शिकायचे?
- सर्वसाधारण पणे आपण विचार केला तर येणारा हा संपूर्ण काळ संगणक चा आहे. आपल्याला संगणक वापरता आले की आपण बरीचशी कामे खूप कमी वेळेत करू शकतो. उदाहरणार्थ, एकावेळी लिहिलेले पत्र अनेकांना पाठविणे, कंपनी मध्ये काम करताना आनेक लोकांचे पगार अतिशय कमी वेळेत काढणे, इत्यादी.संगणक मुळे आपला भरपूर वेळ वाचतो.
2) संगणक कोण कोण शिकू शकतात?
- संगणक लहानांपासून मोठ्यापर्यंत कोणीही सहज शिकू शकते. जसे आपण बच्चे कंपनी सायकल शिकतो आणि आपल्या आई- बहीण शिलाई काम शिकतात तसे संगणक ही शिकणे खूप सोपे आहे.फक्त मनातून भीती निघून गेली की संगणक हाताळणे सहज व सुलभ आहे.संगणक च्या प्रत्येक भागांना आपण सहज हात लावू शकतो, प्रसंगी दुरुस्त ही करू शकतो. संगणक आपले आपले शारीरिक श्रम कमी करते.
3)विद्यार्थी म्हणून मला संगणक चा उपयोग कसा होईल?
- नेहमी च्या प्रचलित शाळेच्या शिक्षणा सोबत संगणक येवू लागले व त्याची आवड निर्माण झाली की आपण संगणक च्या विविध भाषा शिकू शकतो. एकदा संगणक ची भाषा येवू लागली की मग आपण त्याचा उपयोग करून संगणक चे सॉफ्टवेअर स्वतः निर्माण करू शकतो. भविष्यात आपण सॉफ्टवेअर इंजिनिअर किंवा सॉफ्टवेअर चे व्यावसायिक सुध्दा बनू शकतो. संगणक वापरता आल्यामुळे रोजगाराच्या भरपूर संधी विद्यार्थी म्हणून तुम्हाला भविष्यात उपलब्ध होवू शकतात.
4) संगणक शिकून कोणत्या ठिकाणी नोकरी करता येते?
- बँक,कॉल सेंटर,ऑफिस,सॉफ्टवेअर कंपनी इत्यादी ठिकाणी संगणक च्या भरपूर जागा उपलब्ध असतात.
संगणक चा उपयोग करून आपण आपला उद्योग, व्यवसाय मोठा करू शकतो.आपण दिव्यांग आसू तरीही आपण घरून काम पूर्ण करून (work from home) ऑफिसेस ना पाठवू शकतो.
खरचं म्हणूनच मला असे वाटते की संगणक हा आपला सोबती म्हणजेच "मित्र" आहे.
चला तर मग आपण भेटुयात पुढच्या भागात.
तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.
लेखन: ® समता दिपक पाटील
M.Sc.(Computer Science)
(पुणे)
Comments
Post a Comment