Posts

Showing posts from October, 2024

माझी कविता

समजून घेणारी कोणी माणसं  नाही भेटली  म्हणून काय झालं... आता आपणच  समजावायचे स्वतःला, तेही गोड गाणी ऐकत  अन् गंमत गोष्टी सांगत.. बंद कर विस्कटलेल्या भावनांचे कान आणि गच्च पकड तुझ्या अंतर मनातले विचार.. शोध तू तूझ्या  हरवलेल्या वाटा  आणि बांध एक  भक्कम भिंत मनात.. त्यांना त्याचं काम करू दे निवांत, डगमगू नको तू मात्र अशा अशांत वादळात.. कारण वादळात धूळ ही उडतेच अन् थोड्याच वेळात स्वच्छ होते ते धुसरलेले आकाश..  त्या निरभ्र,निश्चल आकाशात करून घे स्वतःच्या मनाला शांत-शांत आणि गात रहा गाणे  तुझ्या अंतर मनातल्या प्रकाशात.. पाठव त्याला ही कधीतरी  एक मनसोक्त चिट्टी  आणि आठव तुझ्या  चांगल्या विचारांची पेटी.. भरभरून बोल त्या सोबत कधी हसत,कधी रडत कधी भांडण ही  कर मनापासून.. असे मनसोक्त जग विचारांचे पंख पसरून लाव तुझे कर्तव्य पणाला दे आनंद या अतृप्त मनाला.. सौ. समता दिपक पाटील. पुणे,महाराष्ट्र. 16/10/2024

आजोळचं गाव

Image

भविष्याच्या शोधात...*

*भविष्याच्या शोधात...* नाही करायची स्पर्धा कोणाशी घ्यायचा मोकळा श्वास  आणि ठेवायचा आहे  विश्वास फक्त स्वतःवर.... स्वतःच्या विचारांनी जगण्याचं  आहे बळ प्राप्त करायचं स्वाभिमानाने जगण्यासाठी द्यायचा विचारांचा लढा मनाशीच.. नाही खचायचं आता कुठे ही स्वतःच घडवायचं नवं जग अन् झेलायची आव्हानं  दररोज नवनविन... शोधायची नवीन वाट घ्यायचा नवीन ध्यास  करायचे सीमोल्लंघन नवीन स्वप्नांचे... पेलायचे इंद्रधनुष्य उधळायचे सप्तरंग  अन् शोधायच्या दाहीदिशा  वेड्यासारख्या... बिलगायचे घट्ट मुठीला पकडलेल्या स्वप्नांना अन् भेटायचे आहे  अंतर मनातल्या सत्याला... भेटेल एकना एक दिवस त्याची ही वेळ आहेत काळाशी गट्टी आहे वेळेची कट्टी आहे... नियती कशी आहे  याचा नको कधी मनात त्रागा, मनात माझ्या नेहमीच एक पवित्र विचार आहे... स्वप्नांची आसं आहे विचारांना पंख आहेत झेप मला घ्यायची आहे फक्तं संधी हवी आहे... हवे आहेत विचार नवे  उडण्यास मुक्त आकाश धिर थोडं धरून आहे  माझ्या शक्ती नुसार... नाही कवटाळायचे आता  कोणाच्या गळ्या-गळ्यात निश्चिंत वाट शोधायची आहे  हवा भरून पं...