माझी कविता
समजून घेणारी
कोणी माणसं
नाही भेटली
म्हणून काय झालं...
आता आपणच
समजावायचे स्वतःला,
तेही गोड गाणी ऐकत
अन् गंमत गोष्टी सांगत..
बंद कर विस्कटलेल्या
भावनांचे कान
आणि गच्च पकड तुझ्या
अंतर मनातले विचार..
शोध तू तूझ्या
हरवलेल्या वाटा
आणि बांध एक
भक्कम भिंत मनात..
त्यांना त्याचं काम
करू दे निवांत,
डगमगू नको तू मात्र
अशा अशांत वादळात..
कारण
वादळात धूळ ही उडतेच
अन् थोड्याच वेळात
स्वच्छ होते ते
धुसरलेले आकाश..
त्या निरभ्र,निश्चल आकाशात
करून घे स्वतःच्या मनाला शांत-शांत
आणि गात रहा गाणे
तुझ्या अंतर मनातल्या प्रकाशात..
पाठव त्याला ही कधीतरी
एक मनसोक्त चिट्टी
आणि आठव तुझ्या
चांगल्या विचारांची पेटी..
भरभरून बोल त्या सोबत
कधी हसत,कधी रडत
कधी भांडण ही
कर मनापासून..
असे मनसोक्त जग
विचारांचे पंख पसरून
लाव तुझे कर्तव्य पणाला
दे आनंद या अतृप्त मनाला..
सौ. समता दिपक पाटील.
पुणे,महाराष्ट्र.
16/10/2024
Comments
Post a Comment