भविष्याच्या शोधात...*

*भविष्याच्या शोधात...*

नाही करायची स्पर्धा कोणाशी
घ्यायचा मोकळा श्वास 
आणि ठेवायचा आहे 
विश्वास फक्त स्वतःवर....

स्वतःच्या विचारांनी जगण्याचं 
आहे बळ प्राप्त करायचं
स्वाभिमानाने जगण्यासाठी
द्यायचा विचारांचा लढा मनाशीच..

नाही खचायचं आता कुठे ही
स्वतःच घडवायचं नवं जग
अन् झेलायची आव्हानं 
दररोज नवनविन...

शोधायची नवीन वाट
घ्यायचा नवीन ध्यास 
करायचे सीमोल्लंघन
नवीन स्वप्नांचे...

पेलायचे इंद्रधनुष्य
उधळायचे सप्तरंग 
अन् शोधायच्या दाहीदिशा 
वेड्यासारख्या...

बिलगायचे घट्ट मुठीला
पकडलेल्या स्वप्नांना
अन् भेटायचे आहे 
अंतर मनातल्या सत्याला...

भेटेल एकना एक दिवस
त्याची ही वेळ आहेत
काळाशी गट्टी आहे
वेळेची कट्टी आहे...

नियती कशी आहे 
याचा नको कधी मनात त्रागा,
मनात माझ्या नेहमीच
एक पवित्र विचार आहे...

स्वप्नांची आसं आहे
विचारांना पंख आहेत
झेप मला घ्यायची आहे
फक्तं संधी हवी आहे...

हवे आहेत विचार नवे 
उडण्यास मुक्त आकाश
धिर थोडं धरून आहे 
माझ्या शक्ती नुसार...

नाही कवटाळायचे आता 
कोणाच्या गळ्या-गळ्यात
निश्चिंत वाट शोधायची आहे 
हवा भरून पंखात...
 
घ्यायची आहे भरारी 
उंच उडणाऱ्या नभात 
आणि पेलायची आहेत 
भरीव स्वप्ने भविष्याच्या शोधात...

सौ. समता दिपक पाटील, 
पुणे,महाराष्ट्र.
01/10/2024

Comments

Popular posts from this blog

गुरू वंदन

मजेत शिकूया संगणक,भाग-1