#भाग:1 विद्यार्थीमित्र हो, हे खरच आहे आपण अगदी मजे मजेत संगणक शिकणार आहोत. संगणक म्हणजे तरी काय हो?? एक मानवनिर्मित यंत्रचं ना! त्याचा शोध सुद्धा तुमच्या आमच्या सारख्याच सामान्य माणसाने लावला. म्हणजे आपण सुद्धा थोडा प्रयत्न केला की संशोधक बनू शकतो. मित्रहो,संशोधक कोणी निराळे प्राणी नसतात.ते सुध्दा आपल्यातलेच एक असतात.ते एक काम करतात ते काम आपण करण्यास आळस व कंटाळा करतो. ते कोणते काम बरे? "मेहनत, कष्ट.." मग,मेहनत आपण ही करतो की. पण ही मेहनत,हे कष्ट योग्य दिशेने जे करतात त्यांना यश नक्कीच मिळते. यश मिळवणे खूप सहज व सोपे आहे. जसे की तहान लागली की आपण पाण्याचा ग्लास हाताने उचलतो व तो अतिशय सहज पितो.पानी पिण्यासाठी सुद्धा हाताची हालचाल करावी लागते,मेंदूला ऑर्डर द्यावी लागते ही सर्व क्रिया म्हणजे एक प्रकारचे कार्य/काम अर्थात हे सुध्दा कष्टच होय. पाणी पिण्याची आपली इच्छा निर्माण होते म्हणून आपण पाण्याचा शोध घेतो व पाणी पिऊन तृप्त होतो. जशी क्रिया तशी प्रतिक्रिया ही घडते. तसे जेव्हा आपल्या मनात आपण यशस्वी व्हावे असे भाव निर्माण होतील तेव्हा आपण शोध घेतो. मी काय केले तर मला यश मिळेल...
Comments
Post a Comment