मला आवडलेले पुस्तक - एक होता कार्व्हर || श्रुतेश दिपक पाटील
नमस्कार रसिक श्रोतेहो,
मी कुमार 'श्रुतेश दिपक पाटील'
आज मी मला आवडलेल्या पुस्तकाबद्दल म्हणजेच एक होता कार्व्हर या पुस्तकाविषयी मला काय वाटले हे मी माझे मत व्यक्त करत आहे.
या पुस्तकाने माझ्या बालमनावर अमुलाग्र बदल केला मला लहानपणीपासून खूप वाचनाची आवड आहे मी साडेसात वर्षाचा असताना मला आईने एक होता कार्व्हर हे पुस्तक माझ्या हाती ठेवले आणि मी सहजच वाचायला बसलो आणि मला ते पुस्तक खूप आवडले आणि मी ते पुस्तक हळूहळू वाचून पूर्ण ही केले . तेव्हा आईने फेसबुक वरती वीणा गव्हाणकर यांच्याशी संपर्क साधला आणि मी पुस्तक वाचलेले त्यांना सांगितले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला त्यांनी मला फेसबुक पेजवर शब्दरूपी आशीर्वाद दिला. तर आता मी माझ्या मुख्य विषयावरती वळतो.
खरे तर जॉर्ज कार्व्हर मुख्यतः निग्रो होते त्यामुळे त्यांना वाळीत टाकले गेल्यामुळे त्यांना त्यांची प्रगती करता आली नाही तरीपण गरीब परिस्थिती वरती मात करून पडेल ते काम करून आपले शिक्षण पूर्ण करणारे जिद्दी कार्व्हर हे पहिलेच निग्रो होते. त्यांचे जीवन खूप कष्टमय होते लहानपणी त्यांची तब्येत खूप खालावली गेली होती परंतु सुजन बाईंनी त्यांची सुश्रुषा केल्याने त्यांची तब्येत पुन्हा गुटगुटीत झाली परंतु वारंवार होणाऱ्या खोकल्यामुळे त्यांना खूप त्रास होत असे. त्यांना लहानपणी बोलता पण येत नव्हते. नंतर त्यांच्या शाळांनी म्हणजेच नीओशो ,सिम्पसन कॉलेज आणि कृषी विद्यालय यांनी कार्व्हरांच जीवनच पालटून टाकले त्याच्यानंतर निग्रोंना स्वातंत्र्य मिळाले आणि टस्किगीमध्ये एक निग्रोंसाठी शाळा चालू झाली. त्या शाळेचे शिक्षक बुकर टी वॉशिंग्टन यांना कार्व्हर यांची ख्याती कळाल्यावर कार्व्हर यांना आपल्या शाळेत बोलून घेतले आणि तेव्हा कार्व्हर यांनी ही देवाची देणगी असे म्हणून ते आपल्या कामावरती मनापासून काम करायला निघाले. त्यांच्यामुळे संपूर्ण निग्रो वंशीच नाही तर संपूर्ण दक्षिण अमेरिका धन्य झाली. त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत टस्कीगी मध्ये आपले काम चालूच ठेवले. त्यांनी भुईमुगापासून 300 तर रताळ्या पासून 107 वस्तूंचे शोध लावले. पण या महामानवाने अॅलबामा मध्ये अखेरचा श्वास सोडला. या महामानवाची आठवण म्हणून reckham holt यांनी George Washington carwer हे पुस्तक लिहिले त्याचा मराठी अनुवाद हा वीणा गव्हाणकर यांनी केला आहे. अगदी अविस्मरणीय माहिती होल्ट यांच्या पुस्तकांमध्ये लिहिली आहे आणि वीणा गव्हाणकरांचे एक होता कार्व्हर याच्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे जॉर्ज कारवारांना अनेकांनी त्यांना निगर, निग्रो असे म्हणून त्यांना चिडवले परंतु त्यांनी हार न मानता अखेरच्या श्वासापर्यंत कष्ट आणि कष्टच करत राहीले अशा कार्व्हर यांच्या चरणी माझे विनम्र अभिवादन आणि आणि मला आयुष्यामध्ये कार्व्हर यांच्या सारखेच कष्ट उपसण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आता मी माझ्या वाक्यांना इथेच विराम देतो ,
'धन्यवाद '
कु. श्रुतेश दिपक पाटील, पुणे.
Comments
Post a Comment