मी आता... (माझी कविता)

सर्वांशी मनसोक्त राहणं,
सोडून दिलं मी आता...

लोकं आपला वापर करतात 
आणि फेकतात ही सहजचं...
आपल्या विचारांनाचं...
नव्हे..  नव्हे.. 
कधी कधी नकळत, 
आपल्याला ही कचरा-कुंडी 
करतात.. बऱ्याचदा...

आहोरात्र विचार करतो 
आपण त्यांचा...
पण, तरीही त्यांना नसतो 
विचार आपला..

फक्त आसतात त्यांनाच अडचणी,
त्यांनाच आसतात मूलबाळ,
संसार
अन् दुखणं ही शरीराचं...

गरजे नुसार घेतात मनसोक्त वेळ 
आणि मदत ही,
तरीही महत्त्वाच्या वेळी ठेवतात 
आपल्या हातावर तुरी...

स्वतः च्या डोळ्यात 
नीट न पाहता.. 
पाहतात आपल्याच डोळ्यात..

नाही दिसतं ओ यांना 
आपल्या स्वतःच्या डोळ्यातील कुसळं,
त्यांना दिसत आसते फक्त आणि फक्त 
आपल्या डोळ्यातील मुसळं...

स्वतः ला हे आसं सिद्ध 
करायचं म्हणजे...
तरी काय हो...?

प्रत्येकाला त्याच्या ही जिवनात 
असतो सुखाचा सुगंध 
तर असतो कधी अज्ञात दुःख.

नसतं येत प्रत्येकाला 
सांगता आपलं खरं दुःख,
म्हणून काही त्याला
नसेल का स्वतःच्या वेदना?

जेव्हा करतो 
आपण विचार सर्वांचा,
तेव्हा आपोआप 
 जाग्या होतात संवेदना.

कधी मौन राहून जगण्यातला 
आनंद घेणारी पाखरे भेटतात,
तर कधी भेटतो
फक्त एका हास्याने 
व्यक्त होणारं समाधान..

या मुक्त वाटेवर
भेटतात मला असे 
अनेक अडथळ्यांचे मार्ग..
अन् बनवितात आणखीन..
जगण्यासाठी खंबिर..

नविन संकट पेलण्यासाठी...
अन् 
नविन वाट शोधण्यासाठी... मी अधीर..

 सौ.समता दिपक पाटील 
 पुणे, महाराष्ट्र
27/09/2024

Comments

Popular posts from this blog

गुरू वंदन

मजेत शिकूया संगणक,भाग-1