मजेत शिकूया संगणक,भाग-1
#भाग:1
विद्यार्थीमित्र हो,
हे खरच आहे आपण अगदी मजे मजेत संगणक शिकणार आहोत. संगणक म्हणजे तरी काय हो??
एक मानवनिर्मित यंत्रचं ना! त्याचा शोध सुद्धा तुमच्या आमच्या सारख्याच सामान्य माणसाने लावला.
म्हणजे आपण सुद्धा थोडा प्रयत्न केला की संशोधक बनू शकतो.
मित्रहो,संशोधक कोणी निराळे प्राणी नसतात.ते सुध्दा आपल्यातलेच एक असतात.ते एक काम करतात ते काम आपण करण्यास आळस व कंटाळा करतो.
ते कोणते काम बरे?
"मेहनत, कष्ट.."
मग,मेहनत आपण ही करतो की. पण ही मेहनत,हे कष्ट योग्य दिशेने जे करतात त्यांना यश नक्कीच मिळते.
यश मिळवणे खूप सहज व सोपे आहे. जसे की तहान लागली की आपण पाण्याचा ग्लास हाताने उचलतो व तो अतिशय सहज पितो.पानी पिण्यासाठी सुद्धा हाताची हालचाल करावी लागते,मेंदूला ऑर्डर द्यावी लागते ही सर्व क्रिया म्हणजे एक प्रकारचे कार्य/काम अर्थात हे सुध्दा कष्टच होय.
पाणी पिण्याची आपली इच्छा निर्माण होते म्हणून आपण पाण्याचा शोध घेतो व पाणी पिऊन तृप्त होतो.
जशी क्रिया तशी प्रतिक्रिया ही घडते.
तसे जेव्हा आपल्या मनात आपण यशस्वी व्हावे असे भाव निर्माण होतील तेव्हा आपण शोध घेतो. मी काय केले तर मला यश मिळेल?कोणता अभ्यास करावा?कोणता विषय निवडावा? स्कोप कोणत्या कोणत्या विषयात आहे? त्याच सोबत माझी आवड कशात आहे?मला मिळणारे अवती भवतीचे वातावरण किती पोषक आहे? किंवा मला आवडणारी गोष्ट कुठे भेटेल?मला यासाठी किती वेळ,पैसे खर्च करावे लागतील? या सर्वांचा सारासार विचार सुध्दा आपल्या यश मिळविण्यात सहभागी असतो.
ही यश मिळविण्याची पूर्व तयारी झाली की मग खऱ्या यशाच्या शोधत आपण आपला प्रवास सुरू करतो. आपला प्रवास एकदा सुरू झाला की तो अनेक कष्ट व यातना सोसाव्या लागल्या तरी आपण मागे वळून पाहायचे नसते.सहजरित्या आपल्याला जर काही भेटलेच तर ते यश कसले. सरळ व गुळगुळीत सपाट मार्ग मिळाला की गाडी भरधाव वेगाने पळू लागते.तेव्हा अपघाताची शक्यता जास्त असते.त्यामुळे अनेक चढ-उतार पाहून मग आपण यशस्वी झालो की मग त्याचा आनंद काही औरच!
चला तर मग आपण ही संगणक शिकण्याची जिद्द व कष्ट थोडे घेवूयात.सहज सोप्या भाषेत संगणक शिकुयात.
मग तयार आहात ना...!
आसलंच पाहिजे.
लेखन: ® सौ.समता दिपक पाटील
M.Sc.(Computer Science )
(पुणे)

खूप सुंदर ताई
ReplyDeleteThank you tai💕🙏
Deleteताई, तुम्ही खूपच छान लेखन करता. अगदी सहज, सुंदर,सोप्या भाषेत. आपल्या या लिखाणाच्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा 💐
ReplyDeleteThank you very much ताई 💕🙏
Deleteखूप सुंदर विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आह
ReplyDeleteThank you very much 🙏
ReplyDelete